कात्रजमध्ये दुचाकीस्वार टोळक्याकडून रिक्षाचालकावर वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकीस्वार टोळक्याने रिक्षाचालकावर वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. त्याशिवाय त्यांच्या मित्रालाही बेदम मारहाण करीत जखमी केल्याची घटना 14 फेब्रुवारीला रात्री पावणेआठच्या सुमारास कात्रजमधील सच्चाईमाता पायथा परिसरात घडली.

दत्ता शिंदे (वय 23, रा. कात्रज) असे गंभीर जखमीचे नाव आहे. तर प्रथमेश घाडगे (रा. संतोषनगर ,कात्रज) यालाही टोळक्याने बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी 12 जणांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी दत्ता हे रिक्षाचालक असून 14 फेबु्रवारीला रात्री साडेसातच्या सुमारास प्रवाशांची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी चार दुचाकीवर आलेल्या 12 जणांनी हाच आहे, हाच तो असे म्हणत दत्ताला बेदम मारहाण केली. त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने वार करुन गंभीररित्या जखमी केले. त्यावेळी भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रथमेशलाही टोळक्याने बेदम मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात तपास करीत आहेत.