
राज्यभरात उद्यापासून पेट्रोल पंप चालक संप करणार असून त्यामुळं पंप बंद राहणार असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळं आपल्या वाहनांमध्ये इंधन भरुन घेण्यासाठी पंपावर ठिकठिकाणी मोठी गर्दी उसळली. मात्र पेट्रोल पंप चालकांचा असला कुठलाही संप नसून वाहतूकदारांचा संप असला तरी पोलीस बंदोबस्तामध्ये पेट्रोल पंप सुरू राहणार असल्याचे पेट्रोल पंप डीलर असोसिएशनचे अली दारूवाला यांनी सांगितले.
पुणे शहर आणि परिसरामध्ये दुपारनंतर पेट्रोल पंपांवर एकच गर्दी दिसून आली. पेट्रोल पंप चालक संप करणार असल्याने उद्या पेट्रोल मिळणार नाही म्हणून झालेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना धाव घ्यावी लागली. या संदर्भात पेट्रोल-डिझेल कडून काढून संपाचा किंवा पेट्रोल पंप बंद संघटनेची कोणतीही भूमिका नाही. असे स्पष्ट करण्यात आले.
राज्याच्या विविध भागात पसरलेल्या या अफवेमुळं पेट्रोल मिळणार नाही या भीतीनं पेट्रोल पंपवर वाहनांची एकच गर्दी झाली आहे. सरकारच्या नवीन कायद्याविरोधात ट्रक चालकांच्या आंदोलनाचा परिणाम दिसून आला. प्रत्यक्षात पेट्रोल पंप चालकांचा यामध्ये कोणताही सहभाग नाही पेट्रोल पुरवठा नेहमीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचे अली दारूवाला यांनी स्पष्ट केले.

























































