
पुढील महिन्यापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. अद्यापि वेळापत्रक जाहीर झाले नसले, तरी माध्यमिक शिक्षण विभागाने परीक्षेची तयारी सुरू केली आहे. यात परीक्षा केंद्र निश्चित करणे आणि अन्य तयारीचा समावेश आहे. जिल्ह्यात दहावी परीक्षेसाठी १७९ केंद्रे आणि बारावीसाठी १०७ केंद्रांचा समावेश आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर माध्यमिक परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी तयारी करीत असते. यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून, यात शिक्षणाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश असतो. भरारी पथके, उपद्रवी केंद्र यांची यादी तयार करण्यात येते. परीक्षेच्या तयारीचा पहिला भाग म्हणजे परीक्षा केंद्र निश्चित करणे असून, ते काम पूर्ण झाले आहे. दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी शाळा, ज्युनियर कॉलेजकडून परीक्षा बोर्डाकडे नोंदणी करण्यात येते. नोंदणी झाल्यावर परीक्षेच्या आधी परीक्षा बोर्डाकडून प्रत्येक जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांची संख्या कळविण्यात येते.

























































