पुणे – भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात 20 नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास जांभुळवाडीत घडला. याप्रकरणी ट्रकचालकाविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र खंडेराव साळुंखे (वय 41) रा. मांगडेवाडी असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार प्रकाश शिंदे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र हे 20 नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून मांगडेवाडीकडे जात होते. त्यावेळी भरधाव ट्रकचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या राजेंद्रचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.