बनावट व्हिसावर लंडनवारी करणे अंगाशी, पंजाबच्या बचित्तर सिंगला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षणासाठी लंडनला गेल्यावर तेथे ब्लॅक लिस्ट केल्याने पोर्तुगाल देशाचा बनावट व्हिसा तयार करणाऱ्या तरुणाला सहार पोलिसांनी अटक केली. बचित्तर सिंग असे त्याचे नाव आहे. त्याने पोर्तुगालच्या व्हिसावर दोन वेळा मुंबई ते लंडन असा प्रवास केल्याचे तपासात समोर आले आहे.

बचित्तर हा पंजाबचा रहिवासी असून तो 2018 मध्ये मॅनेजमेंटचे शिक्षण घेण्यासाठी स्टुडन्ट व्हिसावर लंडनला गेला होता. कॉलेज शिकत असताना तो लंडन येथील एका दुकानात अर्धवेळ काम करायचा. त्याला कॉलेजमध्ये ब्लॅक लिस्ट केल्याने त्याचे शिक्षण अर्धवट राहिले. त्यानंतर बचित्तरने लंडन येथे एका एजंटच्या मदतीने पोर्तुगालचा बनावट व्हिसा आणि पासपोर्ट तयार केला. बनावट पासपोर्टवर तो तीन वेळा नातेवाईकांना भेटण्यासाठी हिंदुस्थानात देखील आला होता. गेल्या आठवडय़ात बचित्तर हा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर आला. नोकरीसाठी तो पुन्हा लंडनला जात होता. बचित्तर हा मुंबई ते लंडन विमानाने प्रवास करताना तो हौनलो विमानतळाकर उतरला. तेथील विमानतळावरील अधिकाऱ्याने बचित्तरच्या व्हिसा आणि पासपोर्टची तपासणी केली. विमानतळावरील अधिकाऱ्याने बचित्तरची कसून चौकशी केली तेव्हा फसवणुकीचा प्रकार समोर आला. बचित्तर हा पोर्तुगालचा रहिवासी नसून तो मूळचा हिंदुस्थानी नागरिक असल्याचे उघड झाले. त्याला हौनलो विमानतळावरून पुन्हा मुंबईला पाठवले. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली.