अरे बापरे! मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ६ फुटी अजगर

80

सामना ऑनलाईन । कुर्ला

मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये रस्त्यावर बुधवारी रात्री ६ फुटी अजगर आढळला. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्याचे गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मच्याऱ्यांना रात्री अडीच वाजेच्या सुमारास हा अजगर दिसला. रस्त्यावरून अनेक वाहने जातात आणि या वाहनाखाली येऊन या अजगराचा मृत्यू होऊ नये म्हणून पोलिसांनी ठिकाणी बॅरिकेट्स लावले.

पोलिसांनी सर्प मित्रांना बोलावून या अजगराला पकडले. गुरुवारी या अजगराला ठाणे येथील जंगलात वनविभागाच्या हद्दीत सोडण्यात आले. हा अजगर वन विभागाकडे देण्यापूर्वी येथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आला. त्यावेळी अजगराने फुत्कार सोडल्यामुळे मोठ-मोठ्या गुन्हेगारांना बेड्या ठोकणारे पोलिसही दचकून एक पाऊल मागे सरकले.

पहा व्हिडीओ:

आपली प्रतिक्रिया द्या