क्षत्रिय गौरव सेवा संस्थेच्या वतीने संतोष आर. एन. सिंह यांचा सत्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्षत्रिय गौरव सेवा संस्थेच्या वतीने उत्तर भारतीय संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष आर.एन. सिंह यांचा सत्कार करण्यात आला. वांद्रे येथे झालेल्या या कार्यक्रमात आपण प्रत्येक गरीब उत्तर हिंदुस्थानींना मदतीचा हात देणार असल्याची ग्वाही संतोष सिंह यांनी दिली.

उत्तर भारतीय संघाच्या अध्यक्षपदी संतोष आर.एन. सिंह यांची नुकतीच निवड झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज उदय प्रतापसिंह, सुधाकर सिंह यांच्या उपस्थितीत संतोष सिंह यांचा सत्कार केला. याप्रसंगी उत्तर भारतीय संघाचे उपाध्यक्ष रमेश बहादूर सिंह, नगरसेवक विक्रम प्रताप सिंह, अजय सिंह, काँग्रेसचे दया शंकर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आदी उपस्थित होते.