
लहान मुलाने दुचाकीला सायकल आडवी घातल्याच्या किरकोळ वादातून तरुणाचा खून झाल्याची घटना राहाता शहरात घडली आहे. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. रोहित वर्मा (वय 20) असे मृताचे नाव असून, अरबाज शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहाता शहरानजीक पंधरा चारी शिवारात शनिवारी रात्री साडेनऊ वाजता रोहित वर्मा याच्या दुचाकीला शेजारी राहणाऱया कुटुंबातील लहान मुलाने सायकल आडवी घातली होती.
या किरकोळ कारणातून वाद झाल्याने त्या लहान मुलाचा मोठा भाऊ अरबाज शेख याने साथीदारांच्या मदतीने रोहितला बेदम मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी रोहित वर्मा बाजूच्या शेतात पळाला असता अरबाज आणि साथीदारांनी पाठलाग करत धारदार शस्राने वार करून त्याचा खून केला. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































