कॅन्सरग्रस्तांसाठी रहेजा फाऊंडेशनचे ‘होप 2021’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीला गोपाल रहेजा फाऊंडेशनने टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील कॅन्सरग्रस्त लहान मुलांसाठी ‘होप 2021’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला बॉलीवूडमधील अनुराग बसू, अमोल गुप्ते आणि प्रसिद्ध विनोदी अभिनेता जॉनी लीव्हर यांनी हजरी लावली होती. शीला गोपाल रहेजा फाऊंडेशन, शिक्षण, आरोग्य काम करते. शुक्रवारी टाटा मेमोरिअल हॉस्पिटल आणि इम्पैक्ट फाउंडेशन यांच्याशी संलग्न होऊन कॅन्सर ग्रस्तांसाठी कार्यक्रम करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. या कार्यक्रमात 200 पेक्षा जास्त कॅन्सर सर्व्हायव्हर मुलांनी मोठया उत्साहाने भाग घेतला.