
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले असून भाजपचे सारे चौकीदार चोर असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची एक बातमी शेअर केली असून त्यात भाजपचे सारे चौकीदार चोर असल्याचे म्हटले आहे.
BJP ke sare Chowkidar Chor Hai.
NoMo
Arun Jaitley
Rajnath Singh
——-
——-
——- https://t.co/jRmdkYjAhg— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 22, 2019
येडियुरप्पा यांनी भाजपच्या केंद्रिय समितीला एक हजार कोटी रुपये दिले अशी बातमी कारवाँ या मासिकाने दिली आहे. ही बातमी राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे आणि भाजपचे चौकीदार चोर असे म्हणून नमो, अरुण जेटली आणि राजनाथ सिंह यांचे नावही नमूद केले आहे.
त्याआधी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. तसेच या प्रकरणाचे लोकपालकडून चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. दुसरीकडे भाजपने हे आरोप फेटाळले असून येडियुरप्पांच्या ज्या डायरीतून हे खुलासे झाले आहे त्याच्या विश्वासार्हेतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


























































