
सामना ऑनलाईन । तिरुवनंतपुरम
माकपचे ज्येष्ठे नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतनंदन यांनी राहुल गांधींना अमुल बेबी म्हणून काँग्रेसवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी वायनंदमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच काँग्रेस राजकीयदृष्या किती अपरिपक्व आहे याचे हे द्योतक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
CPM leader & former Kerala CM VS Achuthanandan in his Facebook post: But what will be the condition of Congress? Their argument that BJP is their main enemy will be proved wrong. That’s why I called him ‘Amul Baby’ which is relevant now also. https://t.co/L3EDywiBQf
— ANI (@ANI) April 1, 2019
२०११ साली अच्युतनंदन यांनी राहुल गांधींना अमुल बेबी म्हणून टीका केली होती. हे शब्द किती योग्य होते असे त्यांनी मल्याळमध्ये लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. 2019 च्या निवडणुकीत आपले शत्रू पंतप्रधान मोदी आहेत, तेव्हा राहुल गांधी मित्रपक्षांशीच लढत आहेत. यावरून काँग्रेस राजकीयदृष्ट्या किती अपरिपक्व आहे हे दिसून येत असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.
2011 साली अच्युतनंदन यांनी राहुल गांधींना अमुल बेबी म्हटले होते. तसेच त्यांनी काही मतदारसंघात अमुल बेबी पसरवले आहेत असेही त्यांनी म्हटले होते.


























































