सोलापुरात आज राहुल गांधींची सभा

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा होणार आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता मरिआई चौकातील एक्झिबिशन ग्राऊंड येथे सभा आयोजित केली आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या जाहीर सभेस इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सभास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, प्रवक्ते अशोक निंबर्गी, सुशील बंदपट्टे, तिरूपती परकीपंडला, राज सलगर आदी उपस्थित होते.