Lok Sabha 2019 राहुल गांधी पुन्हा गडबडले, नीरव मोदी ऐवजी म्हणाले नरेंद्र मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, चेन्नई
राहुल गांधी यांनी दहशतवादी मसूद अजहरच्या नावापुढे ‘जी’ लावल्याने भाजपच्या नेत्यांनी त्यांना शब्दांनी झोडपून काढलं आहे. राहुल गांधी यांनी बुधवारी विद्यार्थिनींसमोर बोलताना नीरव मोदीऐवजी नरेंद्र मोदी म्हटलं.

राहुल गांधी यांना त्यांची चूक लगेच लक्षात आली. त्यांनी जीभ चावत शब्द दुरुस्त केला. मात्र यावेळी विद्यार्थिनींमध्ये मोठा हशा पिकला होता. काँग्रेसने राहुल गांधी यांच्यासाठी चेन्नईमधल्या विद्यार्थिनींसोबत संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी एका विद्यार्थिनीच्या प्रश्नाला उत्तर देताना करोडो रुपयांची कर्ज बुडवणाऱ्या उद्योगपतींबाबत बोलायला सुरुवात केली. राहुल गांधी म्हणाले की “आम्हाला तो पैसा परत आणायचा आहे जो 15-17 उद्योगपतींकडे आहे. जसं की नरेंद्र…नरेंद्र नाही… नीरव मोदी.” आपली चूक लक्षात येताच राहुल गांधी यांच्याची चेहऱ्यावर हसू आलं होतं. तोपर्यंत संपूर्ण हॉल हास्यकल्लोळात बुडाला होता. मात्र या गोष्टीचा तणाव न घेता राहुल गांधी यांनी आपला संवाद पुढे तसाच सुरू ठेवला होता.