
पर्ससीन जाळय़ा व एलईडी दिव्यांमुळे पारंपरिक मासेमारांचे नुकसान होत आहे. मागील तीन अधिवेशांत यावर चर्चा झालेली नाही. त्यामुळे पर्ससीन जाळी व एलईडी दिव्यांच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनाला दिले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेत हा विषय उपस्थित केला. पर्ससीन जाळय़ा व एलईडीच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली आहे. मागील अधिवेशात सतत हा विषय मांडला आहे. शासनाने कारवाई करण्याचे आदेश दिले होते, पण तरीही कारवाई झालेली नाही याकडे वैभव नाईक यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मागील तीन अधिवेशनांत यावर चर्चा झाली, पण कारवाई झाली नाही. शासनाने या अधिवेशनातच कारवाई करावी असे आदेशही राहुल नार्वेकर यांनी दिले.































































