बायकोला बदडण्याची परवानगी द्या, हेडकॉन्स्टेबलचे अधिक्षकांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

रजा मागण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी कर्मचारी वरिष्ठांकडे अर्ज करतो. हे आपल्याला माहितच आहे. पण छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यात एका हेडकॉन्स्टेबलने चक्क पत्नीला मारहाण करण्याची परवानगी द्यावी यासाठी पोलीस अधिक्षकांना पत्र लिहले आहे. हे पत्र सोशल साईटवर व्हायरल झाले असून हजारों लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय कुमार असे या हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. येत्या २५ जून रोजी छत्तीसगड पोलीस व त्यांचे कुटुंबीय रायपूर येथे धरणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्यासाठी पोलिसांच्या पत्नी व मुलेही उत्सुक आहेत. संजय कुमार याच्या पत्नीनेही या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी हट्ट केला आहे. नेमके हेच संजय कुमारला नको आहे. सरकारदेखील हे आंदोलन होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे संजयने पत्नीला आंदोलनात सहभागी होण्यास नकार दिला आहे. पण तिचा निर्णय ठाम आहे. त्यातच ती एका राजकीय कुंटुंबाशी संबंधित असल्याने संजय कुमारला टेन्शन आले आहे. पत्नीला तो समजवत आहे. पण ती ऐकण्यास तयार नसल्याने संजय कुमारची सटकली आहे. आता पत्नीला छडीचा प्रसाद दिल्याशिवाय ती ऐकणार नाही. असे त्याला वाटत आहे. पण पत्नीचे माहेर राजकीय व्यक्तींशी संबंधित आहे. यामुळे पत्नीला झोडल्यास ते आपल्यावर कायद्याचा बडगा उचलतील अशी त्याला भीती वाटत आहे. म्हणून ‘सेफ गेम’ म्हणून त्यानं थेट पोलीस अधिक्षकांनाच पत्नीला मारझोड करण्याची परवानगी देण्यासाठी पत्र लिहलं आहे.

सध्या या पत्राची छत्तीसगडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र पत्र व्हायरल झाल्यानं पत्नीच्या रागाला त्याला सामोरं जावं लागणार आहे.

letter