परळ कारखाना बंद होऊ देणार नाही; रेल्वे बोर्डाचे रेल कामगार सेनेला अश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळ येथील रेल्वेचा कारखाना बंद होऊ देणार नसल्याचे आश्वासन रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनित शर्मा यांनी रेल कामगार सेनेला दिले आहे. त्यामुळे येथे काम करणाऱया कर्मचाऱयांना दिलासा मिळाला आहे.

रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनित शर्मा यांची भेट घेत परळ कारखाना बंद करू नये अशी आग्रही मागणी केली. तसेच भरती आणि वर्कलोड वाढविण्यासंदर्भात निवेदन दिले. त्याची दखल घेत सुनित शर्मा यांनी परळ कारखाना बंद होऊ देणार नसल्याचे आश्वासन रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळास दिले. दरम्यान परळ कारखान्याच्या भेटीवर आलेल्या सुनित शर्मा यांचा रेल कामगार सेनेच्यावतीने सहकार्याध्यक्ष उत्तम हरमलकर यांनी सत्कार केला. यावेळी महिला आघाडी सरचिटणीस सोनाक्षी मोरे, सचिव रवींद्र जावळे, स्थानीय लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष रमेश कोरगावकर, सदस्य स्वप्नील मयेकर, संदेश कदम उपस्थित होते.