ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवास भाडय़ातील सवलत बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे प्रवाशांना यापुढे सरसकट भाडे सवलत न देण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे. गंभीर आजारांनी त्रस्त प्रवाशांसाठी भाडे सवलत रेल्वेने कायम ठेवली असली तरी ज्येष्ठ नागरिकांसह इतर काही वर्गांसाठी यापुढे प्रवास भाडे सवलत न देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ज्येष्ठांप्रमाणेच महिलांनाही जास्तीचे भाडे न देता प्राधान्याने लोअर बर्थ देण्यात येतील आणि आणखी काही सुविधा लवकरच सुरू होतील, अशी मखलाशी रेल्वेने केली आहे.