हार्बरवर आणखी पाच दिवस ब्लॉक, रात्री 1.30 ते पहाटे 4.45 दरम्यान बेलापूर- पनवेल वाहतूक बंद राहणार

हार्बर मार्गावर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला वाहतूक ब्लॉक आज संपत असतानाच मध्य रेल्वेने पुन्हा पाच दिवस वाहतूक ब्लॉक वाढवला आहे. आज मध्यरात्रीपासून सोमवारपर्यंत हा रात्रकालीन ब्लॉक चालणार असून रात्री 1.30 ते पहाटे 4.45 या वेळेत हार्बरवरील बेलापूर ते पनवेल  लोकल सेवा बंद असणार आहे.

डेडिकेटेड प्रंट कॉरिडॉरच्या कामासाठी  शनिवार व रविवारी पनवेल येथे रेल्वेने मोठा ब्लॉक घेतला आहे. त्यानुसार हा ब्लॉक आज मध्यरात्रीपासून सोमावरी  9 ऑक्टोबरच्या  रात्रीपर्यंत पाच  दिवस मध्यरात्री 1.30 ते पहाटे 4.45 वाजेपर्यत असणार आहे. आतापर्यंतच्या रात्रकालीन ब्लॉकचा विचार करता ब्लॉकची वेळ कमी केल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार असला तरी ब्लॉकची कटकट मात्र कायम आहे.