रेलयात्री वेबसाइटच्या सात लाख युजर्सचा बँक डेटा लीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे तिकीटांची बुकींग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रेलयात्री या खाजगी वेबसाईटवरून तिकीटे बुक करणाऱ्या सात लाख प्रवाशांचे डेबिट कार्ड आणि युपीआय खात्याचा डेटा लिक झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ‘दि नेक्स्ट केब’ या केबसाईटने हे कृत्त दिले आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे रेल्वेची नियमित प्रवासी वाहतूक बंद आहे. केवळ काही स्पेशल गाडय़ा सुरू आहेत. अशा परिस्थितीत रेलयात्री या तिकीट बुकींगची सुविधा देणाऱया थर्ड पार्टी वेबसाईटचा डेटा लिक झाल्याची बातमी आली आहे. वेबसाइटकडून चुकून 7 लाख प्रवाशांची माहिती लीक झाली. यात डेबिट कार्ड डिटेल्स, यूपीआय डेटा आणि वैयक्तीक माहितीचा समावेश असल्याचे समजते. वैयक्तीक माहितीमध्ये नाव, फोन नंबर, ई-मेल आयडी, डेबिट कार्ड नंबर या गोष्टींचा समावेश आहे.

रेलयात्री वेब साइटने युजर्सचा डेटा अशा सर्व्हरमध्ये ठेवला होता ते सर्व्हर असुरक्षित होते आणि त्याला पासवर्डही नव्हता. सेफ्टी डिटेक्टिव्ह नावाच्या एका सायबर सुरक्षा कंपनीला 10 ऑगस्ट रोजी या डेटा लीकची माहिती मिळाली होती. या सर्व्हरमध्ये 43 जीबीचा डेटा होता. ज्यात प्रवाशांचे डिटेल्स होते. 17 ऑगस्टला या सायबर सुरक्षा कंपनीने इंडियन कंप्यूटर इमर्जन्सी रेस्पॉन्स टीम (सीईआरटी) संस्थेलाही यासंदर्भात कळविले होते. सीईआरटी ही केंद्र सरकारची संस्था आहे. नंतर हे सर्व्हर कंपनीने गुपचूप बंद केले असे ‘दि नेक्स्ट वेब’ने म्हटले आहे.

कंपनीचा इन्कार, पण तपास सुरू
युजर्सचा डेटा लीक झालेला नाही, असा दावा रेलयात्रीने केला आहे. परंतु या प्रकरणी तपास करत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. युजर्सचा फायनान्शियल डेटा आणि संवेदनशील माहिती कंपनी स्टोअर करत नाही. या पैकी फक्त काही डेटा स्टोर होतो, असे रेलयात्रीने म्हटले आहे.