गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत पावसाने दडी मारली होती. आता मुंबईत पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. सकाळपासून मुंबई आणि उपनगर भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे मुंबईत उकाडा जाणवत होता. आता पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत आज सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. असे असले तरी याचा वाहतुकीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. रेल्वेच्या लोकल वेळेत धावत असून रस्ते वाहतुकही सुरळीत आहे. वांद्रे, दादर, अंधेरी, जोगेश्वरी भागात मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच दक्षिण मुंबईतही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
दुसरीकडे देशाच्या राजधानीत चांगलाच पाऊस झाला आहे. अनेक भागांत पाणी साचले असून रिक्षा पाण्याखाली बुडाल्या आहेत.