पाऊस आता १४ आणि १५ जुलैला पडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
taxi in mumbai rain

सामना प्रतिनिधी, मुंबई

गेले चार दिवस सलग मुंबईसह उपनगराला झोडपून काढल्यानंतर अखेर पावसाने आज विश्रांती घेतली. दिवसभर मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये पावसाच्या अधूनमधून तुरळक सरी बरसल्या. सलग चार दिवस कोसळल्यानंतर जणू काही पाऊसच सततच्या बरसण्याला कंटाळला. आता तीन दिवस तो विश्रांती घेणार असून पुन्हा १४ आणि १५ जुलै रोजी मुंबईत जोरदार बरसेल. असा स्कायमेटचा अंदाज आहे.

कोकण किनारपट्टी ते गुजरातपर्यंत तयार झालेल्या प्रतिचक्रवाती वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे मुंबईसह उपनगरांमधून पाऊस गायब झाल्याचे स्कायमेटच्या महेश पलावत यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत या वाऱ्यांचा प्रभाव वाढेल आणि पुन्हा मुंबईत जोरदार ते अतिजोरदार पावसाला सुरुवात होईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी मुंबई, ठाण्यात केवळ ढगाळ वातावरण होते. अधूनमधून सूर्यदर्शनही झाले.