राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या आईंनाही कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर घरी उपचार करण्यात येत आहेत.

राज ठाकरे यांची प्रकृती गेले काही दिवस ठीक नव्हती. कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. महापालिका अधिकाऱयांनी राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांचे कोरोनाप्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झालेले आहेत.