नातीच्या स्वागतासाठी पाठवलं हेलिकॉप्टर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील काही भागांमध्ये अजूनही महिला आणि मुलींना कमी लेखलं जातं. दुसरीकडे राजस्थानातील नागौरच्या एका कुटुंबाने समाजापुढे वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. 35 वर्षांनी घरात मुलीचा जन्म झाल्यामुळे आनंद झालेल्या मदनलाल प्रजापत यांनी आपल्या नातीला हेलिकॉप्टरने घरी आणले आहे. ही घटना कुचेर भागातील निंबडी चांदावता या गावातील आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाने मुलीच्या जन्माचा साजरा केलेला हा आनंदोत्सव सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.  नातीच्या स्वागतासाठी मदनलाल यांनी पीक विकून हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. हेलिपॅडपासून घरापर्यंत  रस्त्यात फुलांची उधळण करून मुलीचे स्वागत केले.