धक्कादायक! महिलेला इस्लाम स्वीकारण्यासाठी जबरदस्ती, दुबईत पाठवण्याचा होता कट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जयपूर 

राजस्थानमधील एका महिलेला ब्लॅकमेल करून तिला जम्मू कश्मीरमधे नेऊन इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र कशीबशी स्वत:ची सुटका करून घेत तिने घर गाठले आहे. या पीडितेला 9 महिने कुपवाडामध्ये जबरदस्तीने ठेवले होते, त्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत भेदरलेल्या महिलेने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

राजस्थानच्या बाडमेर येथील 18 वर्षीय महिला 16 मार्च रोजी अचानक बेपत्ता झाली होती. आरोपीने तिला खोटे व्हिडीओ  एडीट करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप तिने केला आहे. तिला कुपवाडामध्ये 9 महिने कोंडून ठेवून मारहाण करत जबरदस्तीने नमाज पठण करायला लावले जात होते. तसेच कोऱ्या कागदांवर तिच्या सह्या घेऊन खोटे दस्तावेज बनवून तिला दुबईला पाठवण्याचा कट सचला होता, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी राजस्थान पोलिसांनी तपास सुरू केला आसून त्यासाठी पोलिसांचे एक पथक जम्मू कश्मीरला पाठवले आहे. तसेच पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल, असे बाडमेरच्या पोलिस अधिक्षक राशी डोगरा यांनी सांगितले आहे.