राजेश टोपे, नाना पटोले यांनी पीडित कुटुबीयांची घेतली भेट, पाच लाखांचा धनादेश सुपुर्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये भंडारा शहरातील भोजपुर सौंजारी नगर मधील बैहरे कुटुंबातील दीड महिन्याच्या मुलीचाही समावेश होता. या पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री विश्वजीत कदम यांनीआई वडिलांचे सांत्वन केले तसेच त्यांना नुकसान भरपाई म्हणून 5 लाख रुपयांचा धनादेश दिला.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) भीषण आग लागली होती. या आगीत दहा अर्भकांचा मृत्यू झाला आहे. धुरामुळे गुदमरून या अर्भकांचा मृत्यू झाला.

शनिवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. या युनिटमध्ये एकूण सतरा अर्भके होती.  त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. या SNCU मध्ये आऊटबॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी आऊट बॉर्न युनिटमधील 10 अर्भकांचा होरपळून मृत्यू झाला.

मृत्युमुखी पडलेली अर्भके एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. बचावकार्यात मॉनिटरमध्ये असलेल्या सात अर्भकांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.