झुनझुनवालांनी ओळखली बाजाराची दिशा, ‘या’ दोन शेअरमधील हिस्सा वाढवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बिग बूल’ राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) हे गेल्या 35 वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये सक्रिय आहे. अवघ्या 5 हजारांपासून त्यांनी गुंतवणुकीस सुरुवात केली होती. परंतु आज ते अरबपती आहेत. राकेश झुनझुनवाला हे एखाद्या शेअरमध्ये पैसे लावण्यापूर्वी त्या कंपनीचा इतिहास आणि भविष्यातील संधी यांचा विचार करतात. त्यामुळेच त्यांच्या पोर्टफोलियोमधील शेअर मजबूत परतावा देतात हे दिसून येते.

राकेश झुनझुनवाला हे आपल्या हे शेअर खरेदी करूनच थांबत नाही, तर त्यावर लक्षही ठेवून असतात.शेष म्हणजे ज्या कंपन्या फंडामेंटली स्ट्राँग असतात अशाच शेअरमध्ये ते गुंतवणूक करतात. तसेच त्यांना वाटले की एखाद्या कंपनीची कामगिरी उत्तम होत आहे, त्यात ते आपला हिस्सा वाढवतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी दोन मेटलच्या शेअरमधील आपली भागीदारी वाढवली होती.

झुनझुनवाला यांनी नाल्को (NALCO) आणि स्टील निर्माता कंपनी सेल (SAIL) मध्ये आपला हिस्सा वाढवला आहे. यातील नाल्को (NALCO) कंपनीच्या शेअरने वर्षभरामध्ये 175 टक्के परतावा दिला आहे, तर सेलने (SAIL) वर्षभरात 185 टक्के परतावा दिला आहे. यातील नाल्को (NALCO) कंपनीच्या शेअरमध्ये झुनझुनवाला यांनी आपली भागीदारी वाढवून 1.6 टक्के, तर सेल (SAIL) मधील भागीदारी वाढवून 1.76 टक्के केली आहे.

झुनझुनवाला यांचा पोर्टफोलियो पहिल्यांदाच जगजाहीर, वाचा कोणत्या कंपनीचे किती शेअर आहेत

सप्टेंबर महिन्यात झुनझुनवाला यांनी या दोन्ही शेअरमधील भागीदारी वाढवली होती. तत्पूर्वी त्यांच्याकडे सेल (SAIL)ची 1.39 टक्के भागीदारी होती. जगभरातील कमोडिटी मार्केटमधील तेजीमुळे त्यांना यातील भागीदारी वाढवल्याचे बोलले जात आहे. या शेअरमधून त्यांना चांगला परतावाही मिळत आहे.

नाल्को (NALCO) आणि कंपनी सेल (SAIL) या दोन्ही खासगी कंपन्या असून मेटल सेक्टरमध्ये चांगला दबदबा आहे. या दोन कंपन्यांसह त्यांच्याकडे टाटाचेही काही शेअर आहेत.