
गेल्या सात महिन्यांपासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने शनिवारी पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण केले. हे आंदोलन अद्याप संपलेले नाही. हे आंदोलन आणखी खूप वेळ सुरूच राहणार असून आगामी 47 महिने हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे एल्गार शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुकारला. यानिमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधत केंद्र सरकारच्या पुढे झुकणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
योगी सरकारविरोधात प्रचार करणार
उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात होणाऱया निवडणुकीत आपण योगी सरकारविरोधात प्रचार करणार असल्याची हाक यावेळी राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा दिली. जेव्हा त्या ठिकाणी प्रचारसभा सुरू होतील त्यावेळी आपण पंचायतींचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर आपण कोणतीही निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट करताना शेतकऱयांच्या मुद्दय़ांवर आपण भाजपविरोधी प्रचार करणार असल्याचेदेखील त्यांनी नमूद केले.





























































