तो माझा न्यूड व्हिडीओ इंस्टाग्रावर पोस्ट करू शकतो, ओक्साबोक्सी रडत राखीने रितेशवर केले गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत कायम काही ना काही कारणाने चर्चेत असतेच. पतीसोबतचा घटस्फोट व त्यानंतर दोन महिन्यातच पुन्हा नवा बॉयफ्रेंड यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत होती. आता तिने तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेशवर गंभीर आरोप केले आहेत. राखी सावंतचे सोशल मीडिया अकाऊंट रितेशने हॅक केल्याचा आरोप राखीने केला असून त्याच्याविरोधात ओशिवारा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by TAHIR JASUS007 (@tahirjasus)


राखी सावंतचा ओशिवारा पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच तिला पॅपाराझिंनी गाठले. त्यांनी तिला तिथे येण्याचे कारण विचारताच राखी ओक्साबोक्शी रडू लागली. त्यावेळी तिने सांगितले की ”पहिल्या बायकोला घटस्फोट न देता माझ्याशी लग्न केले. मला सर्व खोटे दागिने दिले. आता घटस्फोट झालाय तरी मला सुखाने जगू देत नाहीए. सतत एकच बोलतोय तुला व आदिलला बरबाद करणार. गेल्या तीन वर्षात त्याने खूप बऱ्याच गोष्टी केल्या. मला खूप त्रास दिला. आता त्याने माझे सोशल मीडिया अकाऊंट हॅक केले आहेत. सर्व काही हॅक केले. इंस्टाग्राम अकाऊंटवर तो काहीही पोस्ट करू शकतो. माझा न्यूड व्हिडीओ पोस्ट करू शकतो”, असे राखीने मीडियाला सांगितले.

”आम्ही राखीच्या अकाऊंटचा पासवर्ड बदलायला गेलो पण आम्ही लॉग इनच करू शकलो नाही. त्याने सर्व पासवर्ड बदलले आहेत. ती तिचं गुगल पे व फोन पे देखील वापरू शकत नाही. तो आमचे फोन देखील उचलत नाहीए. ना मेसेजला रिप्लाय देत आहे’, असे राखीचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीने सांगितले.