
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा नेहमी कोणत्याना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो. सध्या एका व्हिडीओमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. अलीकडेच राम गोपाल वर्मा अभिनेत्री इनाया सुलतान हिच्या बर्थडे पार्टीत पोहोचला होता. जिथे त्याने रंगीला चित्रपटाच्या गाण्यावर इनायासोबत डान्स केला. मात्र लोकांना राम गोपाल वर्माच्या डान्सची पद्धत आवडली नाही. आता याच व्हिडीओवरून तो चांगलाच ट्रॉल होत आहे.
राम गोपाल वर्माने इनाया सुलतानसोबत कामुक पद्धतीने डान्स केला आहे. ज्यावर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. यावरच आपली बाजू मांडताना राम गोपाल वर्माने ट्विट करत म्हटले आहे की, ‘मला पुन्हा एकदा स्पष्ट करायचे आहे की या व्हिडीओमध्ये जो माणूस आहे तो मी नाही. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये जी मुलगी आहे, ती इनाया सुलतान नाही. मी अमेरिकचे राष्ट्रपती जो बायडन यांची शपथ घेतो.’
I once again want to clarify that the guy in this video is not me and the Girl in Red is not @inaya_sultana and I swear this on American President JOE BIDEN pic.twitter.com/K8nNera7Rc
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) August 22, 2021




























































