आजम खान यांना लोकसभेतून हकला, रमा देवी चिडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rama-devi-azam-khan

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना समाजवादी पक्षाचे खासदार आजम खान यांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान असलेल्या रमा देवी यांच्यासंदर्भा अशोभनीय असे वक्तव्य केल्यानंतर गोंधळ उडाला आहे. खुद्द रमा देवी यांनी आजम खान यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी आपण अध्यक्षांकडे करणार असल्याचे म्हटले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना रमा देवी यांनी आजम खान यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. ‘आजम खान कधीही महिलांचा सन्मान करत नाहीत. जया प्रदा यांच्याबद्दल देखील ते काय म्हणाले होते हे साऱ्यांनाच माहीत आहे. लोकसभेत राहण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. लोकसभेतून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी विनंती मी अध्यक्षांकडे करणार आहे. त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, अशा शब्दात त्यांनी आजम खानवर तोफ डागली.