रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर, शांतिसागर वसाहतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

घाटकोपरचे रमाबाई आंबेडकर नगर, शांतिसागर पोलीस वसाहत आणि कामराजनगर येथील झोपडपट्टय़ांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. 2007 साली या पुनर्वसनाला देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली असून टाऊनशिपच्या माध्यमातून हा पुनर्विकास केला जाणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी आज दिली.

घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर, शांतिसागर पोलीस वसाहत आणि कामराज नगर झोपडपट्टय़ांच्या पुनर्वसनाबाबत आज बैठक आयोजित करण्यात आली होती. रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी जवळपास 155 एकरावर उभी आहे. कित्येक वर्षांपासून या झोपडपट्टय़ांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. सन 2007 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या झोपडपट्टय़ांचा पुनर्विकास करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. तेव्हा टाऊनशिपच्या माध्यमातून विकास करू असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर अधिकाऱयांनी दिलेल्या अहवालानंतर या पुनर्विकासाला स्थगिती दिली. आता ही स्थगिती उठविण्यात आली असून टाऊनशिपच्या माध्यमातून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.

महिनाभरात अहवाल सादर
सध्या सुरू असलेल्या योजनांची सद्यस्थिती, त्यातील अडचणीबाबत विकासकांशी चर्चा करून सध्याची सुरू असलेली क प्रस्तावित योजना टाऊनशिप, ‘स्पेशल प्रोजेक्ट’ म्हणून करण्यासंबंधीची माहिती अहवालात नमूद करावी तसेच आर्थिकरीत्या शासनाची गुंतकणूक करून योजना पुढे कशी नेता येईल यासंबंधी एका महिन्याच्या आत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.