महाराष्ट्राला पहिल्या डावात मोठी आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीला 191 धावसंख्येवर रोखल्यानंतर महाराष्ट्राने 124.5 षटकांत 324 धावसंख्या उभारून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 133 धावांची मोठी आघाडी घेतली. त्यानंतर दिल्लीने दुसऱया डावात उर्वरित 72 षटकांच्या खेळात 5 बाद 233 धावसंख्येपर्यंत मजल मारली असून आता त्यांच्याकडे 100 धावांची आघाडी आहे. तिसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा हिम्मत सिंग 67, तर ललित यादव 6 धावांवर खेळत होते.