
सामना ऑनलाईन । मुंबई
सोनी टिव्हीवरील इंडियन ऑयडॉल 10 मध्ये शनिवारी आणि उद्या रविवारी ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर हजेरी लावणार आहे. शो मध्ये करिष्मा आणि करिना कपूर यांनी आपल्या वडीलांसाठी पाठविलेला एक संदेशही व्हिडीओ रूपात दाखविला जाणार आहे. शोमधून सहा स्पर्धक रणधीर यांची गाजलेली गाणी सादर करतील. तसेच ते चित्रपटसृष्टीतील त्यांचा अनुभव आणि आरके स्टुडीओ आणि राज कपूर यांच्या काही आठवणीही यावेळी शेअर करणार आहेत. हा कार्यक्रम सोनी टिव्हीवर रात्री आठ वाजता सादर होणार आहे.
























































