
कोरोनाच्या सावटाखाली सुरु झालेल्या शिमगोत्सवाची शुक्रवारी रंगांची उधळण करत सांगता करण्यात आली. शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करत अतिशय रत्नागिरीत साध्या पध्दतीने रंगपंचमी साजरी करण्यात आली.
रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीबुवांची पालखी शुक्रवारी दुपारी सहाणेवरुन उठल्यानंतर रंगपंचमीला सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे यंदा रंगपंचमीमध्ये जल्लोष नव्हता. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला. शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करत अतिशय साध्या पध्दतीने रंगपंचमी साजरी करण्यात आली. दुपारी 2 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत रंगपंचमीचा उत्सव सुरु होता.






























































