
उत्तर प्रदेशमध्ये सहा आणि सात वर्षांच्या दोन मुलींवर एका नराधमाने बलात्कार केला दोघी सख्ख्या बहीणी असून आरोपी फरार आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पीडित मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात दोन बहीणी खेळता खेळता गावाबाहेर गेला. तेव्हा एका तरुणाने दोघींना उचलून नेले आणि एका निर्जन ठिकाणी दोघींवर बलात्कार केला आणि दोघींना तिथेच टाकून पळून गेला. दोन्ही मुली रडत रडत घरी पोहोचल्या आणि सर्व हकीगत सांगितली. तेव्हा कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी मुलींना रुग्णालयात दाखल करत त्यांची वैद्यकी चाचणी केली. पोलिसांनी याप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

























































