रत्नागिरी जिल्ह्यात 222 ग्रामपंचायतीपैकी 67 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बिनविरोध

रत्नागिरी जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतीमध्ये 406 उमेदवार सरपंच पदाची निवडणूक लढवत असून 67 ग्रामपंचायत सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. 222 ग्रामपंचायतींमध्ये 1206 उमेदवार ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणूक लढवत आहेत. 1100 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर ग्रामपंचायतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 635 अर्ज आले होते. त्यापैकी 162उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. आता 406 जण निवडणूक लढवत आहेत. 67 सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. सरपंच पदासाठी मंडणगड तालुक्यात 14 ग्रामपंचायतीसाठी 30 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 1 ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली आहे. सदस्य पदासाठी 143 उमेदवार रिंगणात आहेत. दापोलीमध्ये 30 ग्रामपंचायतीसाठी 53 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 9 सरपंच बिनविरोध झाले आहेत. सदस्य पदासाठी 76 उमेदवार रिंगणात आहेत. 184 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. खेड तालुक्यात 10 ग्रामपंचायतीमध्ये 25 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2 सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. सदस्य पदासाठी 61 उमेदवार रिंगणात असून 52 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. चिपळूण तालुक्यात 32 ग्रामपंचायतीमध्ये 44 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 13 सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. सदस्यपदासाठी 101 उमेदवार निवडणूक रिंगणात असून 181 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

गुहागर तालुक्यात 21 ग्रामपंचायतीमध्ये 30 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 9 सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. सदस्य पदासाठी 116 उमेदवार रिंगणात असून 115 जण बिनविरोध निवडून आले आहेत. संगमेश्वर तालुक्यात 36 ग्रामपंचायतीमध्ये 61 उमेदवार रिंगणात असून 16 सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. सदस्य पदासाठी 175उमेदवार निवडणूक रिंगणात असून 167 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. रत्नागिरी तालुक्यात 29 ग्रामपंचायतीमध्ये 58 उमेदवार रिंगणात असून 6 सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. सदस्य पदासाठी 221 उमेदवार रिंगणात असून 134 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. लांजा तालुक्यात 19 ग्रामपंचायतीमध्ये 41 जण सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहेत. 2 सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. 103 सदस्य रिंगणात असून 99 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. राजापूर तालुक्यात 31 ग्रामपंचायतीमध्ये 64 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यातील 9 सरपंच बिनविरोध विजयी झाले आहेत. 210 सदस्य निवडणूक रिंगणात असून 135 सदस्य बिनविरोध झाले आहेत.