
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असताना भाजपच्या जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवत त्यांना घरचा आहेर दिला. आपल्या स्वागताला रत्नागिरी भाजपचा कुणीच पदाधिकारी न आल्याने फडणवीस चांगलेच संतापले. याबाबत तिथूनच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना फोन करून त्यांनी तीक्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. दरम्यान फडणवीस उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या घरी गेल्यानेच भाजप पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
























































