
अतरंगी ग्रुपच्या संकल्पनेतून अतरंगी ग्रुप, मिऱ्या आयोजित करण्यात आलेली भव्य मंगळागौर स्पर्धा २०२६ उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात थाटामाटात संपन्न झाली मराठा भवन, जिल्हा परिषद जवळ, रत्नागिरी येथे झालेल्या या स्पर्धेला महिलांचा तसेच प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध संघांनी पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांचे सादरीकरण करत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.मंगळागौर स्पर्धेत विश्वकर्मा ग्रुप शिरगावने प्रथम क्रमांक पटकावला
स्पर्धेचे परीक्षण प्रणाली तोडणकर आणि गौरी साबळे यांनी केली.स्पर्धेतील विजेते संघ पुढीलप्रमाणे -प्रथम क्रमांक विश्वकर्मा ग्रुप, शिरगाव, द्वितीय- स्वामी समर्थ ग्रुप, घवाळीवाडी,तृतीय क्रमांक- स्वामिनी ग्रुप, परटवणे,
कार्यक्रमाचे निवेदन संजया किर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतरंगी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मनापासून सहकार्य केले. या संपूर्ण उपक्रमात सौ. आदिती अमित भाटकर, सौ. दिपिका मयेकर, सौ. अंकिता सुर्वे, सौ. संजना नार्वेकर, सौ. साक्षी नार्वेकर, सौ. जान्हवी पोयरेकर, सौ. अक्षरा भाटकर, सौ. आकांक्षा किर, सौ. पूजा पिलणकर, सौ. आराध्या किर, सौ. स्मिरा बनप, कु. रिद्धी नागवेकर, कु. नूपुर मुरकर, कु. सुस्मिता मुरकर, सौ. अर्पिता बनप, श्रीम. संजया किर, श्रीम. मृणाल पवार, कु. क्षितिज कुरधुंडकर आणि कु. सार्थक भोवड यांचे मोलाचे योगदान राहिले.

























































