रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवार रिंगणात, एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे निवडणूक रिंगणात 9 उमेदवार उभे आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 7 मे रोजी मतदान होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात एकूण  9 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले होते. त्यामध्ये इंडिया आघाडीकडून विनायक भाऊराव राऊत, बहुजन समाज पक्षाकडून राजेंद्र आयरे, महायुतीकडून नारायण राणे, वंचित बहुजन आघाडीकडून मारुती जोशी, सैनिक समाज पक्षाकडून सुरेश शिंदे, बहुजन मुक्ती पार्टीकडून अशोक पवार आणि अपक्ष शकील सावंत, अमृत तांबडे आणि विनायक लवू राऊत हे उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे अर्ज 20 एप्रिलला वैध ठरले. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. एकाही उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आता 9 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.