‘आयडीबीआय’चे नाव बदलणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयडीबीआय बँकेची 51 टक्के हिस्सेदारी एलआयसीने मिळवल्यामुळे तिचे नाव बदलून एलआयसी आयडीबीआय किंवा एलआयसी बँक करावे, असा प्रस्ताव आरबीआयने नामंजूर केला आहे. बँकेच्या नावात बदल का करणार नाही याचे कारण मात्र आरबीआयने दिलेले नाही. आयडीबीआय बँकेच्या संचालक मंडळाने फेब्रुवारीत नावबदलाचा प्रस्ताव रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पाठवला होता.