
आयपीएल सुरू व्हायला अवघे चार दिवस उरलेले असतानाच या स्पर्धेसमोरील संकट कोरोनामुळे वाढत चालले आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटलचा ऑलराऊंडर अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूचा फलंदाज देवदत्त पडिक्कलला देखील कोरोनाची लागण झाली आहे. पडिक्कलला कोरोनाची लक्षण दिसून आल्यावर त्याला संघापासून वेगळे ठेवण्यात आले होते. आता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

रॉयल चॅलेंजर्सचा पहिला सामना 9 एप्रिलला मुंबई इंडियन्ससोबत चेन्नई येथे होणार आहे. या सामन्याआधीच फॉर्ममध्ये असलेल्या पडिकल्लला कोरोनाची लागण झाल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता त्याला पुढिल काही सामन्यांना मुकावे लागणार आहे.
नुकत्याच झालेल्या विजय हजारे स्पर्धेत पडिक्कलने चांगले प्रदर्शन केले होते. या स्पर्धेत त्याने 7 सामन्यात 147 च्या सरासरीने 737 धावा केलेल्या. ज्यात चार शतक व तीन अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये पडिक्कलने आरसीबीसाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने् आयपीएलच्या पंधरा सामन्यात पाच अर्ध शतकांसहीत 473 धावा केल्या होत्या.



























































