रत्नागिरीतही रुबेला लसीमुळे मुलीला त्रास, उपचारासाठी मुंबईला हलविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, रत्नागिरी  

संपूर्ण देशात रुबेला आणि गोवरच्या उच्चाटनासाठी देशव्यापी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र या लसीचा काही मुलांना त्रास होत असल्याच्या घटना समोर यायला लागल्या आहेत.

गोवर-रुबेला लसीकरणामुळे आठ विद्यार्थ्यांना त्रास, रुग्णालयात दाखल

बुलडाणा आणि हिंगोली जिल्ह्यात लसीकरणानंतर त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातूनही अशीच तक्रार आली आहे. बावनदी येथील न्यु इंग्लिश स्कूल मधील दहावीत शिकणाऱ्या पूनम सांडीम या मुलीची तब्येत लसीकरणानंतर अचानक बिघडली आहे.

गोवर रुबेला लसीकरणामुळे चौथ्या दिवशी आणखी १२ मुलांना रिअ‍ॅक्शन

स्थानिक वार्ताहराने दिलेल्या वृत्तानुसार पूनमला गुरूवारी गोवर रूबेलाची लस टोचण्यात आली होती. यानंतर तिच्या हाताला कंप फुटला. तिची प्रकृती बघून शिक्षकांनी तिच्या घरच्यांना याबाबत कल्पना दिली. पूनमला पहिले कोल्हापूरला उपचारासाठी हलवण्यात आले मात्र नंतर तिथून तिला मुंबईला आणण्यात आले आहे.  हा प्रकार लसीकरणामुळे घडलाय अथवा नाही हे आपण निदान झाल्यावरच सांगू शकतो असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरूध्द आठल्ये यांनी सांगितले आहे.