Redmi Note 11 5G आणि Redmi Note 11 Pro 5G ची किंमत, फिचर्स लीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Xiaomi कंपनीचा सब-ब्रँड असणाऱ्या Redmi च्या Note 11 5G आणि Note 11 Pro 5G या दोन स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स लीक झाले आहेत. Note 11 Pro 5G हे मॉडेल MediaTek Dimensity 92 चिपसेटसोबत बाजारात उतरवले जाऊ सकते. तसेच हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च होईल.

Redmi Note 11 Pro 5G चे फिचर्स

– 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम/256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट
– ओलेड स्क्रीन और 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटचा डिस्प्ले
– 108 मेगापिक्सचला बॅक कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
– 5000 mAh ची बॅटरी

किंमत –

– 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1599 युआन (जवळपास 18 हजार 600 रुपये)
– 8 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1799 युआन (जवळपास 20 हजार 900 रुपये)
– 8 जीबी रॅम/256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1999 युआन (जवळपास 23 हजार 300 रुपये)

Redmi Note 11 5G ची फिचर्स

– ओलेड स्क्रीन और 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटचा डिस्प्ले
– 50 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
– 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज असे दोन व्हेरिएंट
– 5000mAh ची बॅटरी

किंमत –

– 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1199 युआन (जवळपास 14 हजार रुपये)
– 8 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1599 युआन (जवळपास 18 हजार 600 रुपये)