सिध्दी शुगर येथे वाहनास रिफ्लेक्टर बसवण्याचा कार्यक्रम संपन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

अहमदपूर तालुक्यातील सिध्दी शुगर अॅण्ड अलाईड इंड. लि. उजना येथे प्रादेशिक परिवहन विभाग लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्यातील केनयार्ड विभागात ट्रक, ट्रॅक्टर, मीनी ट्रॅक्टर आदी वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्याचा कार्यक्रम सिध्दी शुगरचे एक्झिकेटीव्ह डायरेक्टर अविनाश जाधव साहेब व आरटीओ कांबळे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला.

आरटीओ कांबळे यांनी वाहनचालकांना रोडवरील वाहतूकीसंदर्भात छोट्या कारणाने कसे अपघात होतात. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून रिफ्लेक्टर बसवण्याचे महत्व सांगीतले.

यावेळी कारखान्याचे एक्झिकेटीव्ह डायरेक्टर अविनाश जाधव, जनरल मॅनेजर पी.जी. होनराव, वाहतुक शाखेचे पाटील, वाहतुक निरीक्षक बडे, शेख, जनरल मॅनेजर (केन ) पी.एल. मीटकर, फॅक्ट्री मॅनेजर बी.के.कावलगुडेकर, चीफ केमिस्ट सी.व्ही कुलकर्णी, ऊस विकास अधिकारी वाय.आर.टाळे, ऊस पुरवठा आधिकारी भाकरे, सहा. सुरक्षा अधिकारी शिंदे, संदीप पाटील, वाहतुक ठेकेदार व वाहनचालक उपस्थित होते.