धारावीकरांचा म्हाडा कार्यालयाकर धडक मोर्चा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावी सेक्टर – 5 मध्ये होऊ घातलेल्या पुनर्विकासाबाबत धारावी सेक्टर – 5 पुनर्विकास कृती समितीतर्फे मंगळवाारी   सकाळी काळा किल्ला, धारावी ते म्हाडा कार्यालय, वांद्रे या दरम्यान धडक मोर्चा काढण्यात आला.

 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपविभाग समन्वयक व तासगाव – कवठेमहांकाळ संपर्कप्रमुख गणेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मोर्चाला विभागप्रमुख महेश सावंत यांनी मार्गदर्शन केले. जोपर्यंत धारावीकरांचे आहे तिथेच पुनर्वसन होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच  राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. धारावी विभागातील काळा किल्ला, काजरोळकर चाळ, संग्राम नगर, शिव गंगा सोसायटी, क्रांती नगर परिसर तसेच रेवा फोर्ट कॉलनी झोपडपट्टीमधील हजारो झोपडीधारक या धडक मोर्चासाठी उपस्थित होते.