
राज्यात कोरोनाच्या संसर्गाचा उतरता आलेख लक्षात घेऊन अर्थचक्राला गती देण्यासाठी मुंबई, ठाण्यासह राज्यातल्या 25 जिह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. दुकाने- रेस्टॉरंट रात्री आठ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा दिली जाईल, तर शनिवारी चारपर्यंत खरेदीची मुभा राहील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसांत याबाबतची घोषणा करतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. मात्र अकरा जिह्यांत कोणतेही निर्बंध शिथिल होणार नाहीत, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड टास्क पर्ह्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये निर्बंध शिथिल करण्याच्या संदर्भात आरोग्य विभागाचे अधिकारी व टास्क पर्ह्समधील तज्ञांशी सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर माहिती दिली.
राज्यातल्या आठ जिह्यांमधील मृत्युदराच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, खासगी रुग्णालयातील मृत्युदर सरकारी पोर्टलवर अपलोड होत नाहीत. म्हणून अनेकदा एक-दोन महिन्यांचे साठलेले रिपोर्ट हळूहळू देत असतात. त्यामुळे मृत्युदर काही जिह्यांमध्ये वाढलेला दिसतो. पण लवकर चाचणी-निदान केले जात नाही. हे मृत्युदर वाढण्याचे कारण असू शकते. पण पूर्वी मृत्युदर 2.38 टक्के होता तो आता 1.14 टक्क्यापर्यंत आला आहे.
लग्नाला 100 जणांची उपस्थिती
लग्नसोहळे, समारंभातील उपस्थितांची संख्या वाढवण्याचा विचार करता येईल. 100 लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करता येतील अशी शिफारस टास्क पर्ह्सने केली आहे. सर्व कर्मचाऱयांचे लसीकरण झाले आहे अशी ऑफिसेस 50 टक्के कर्मचारी क्षमतेनुसार सुरू ठेवण्यात येतील. चित्रपटगृहांवरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय होईल. व्यायामशाळांनाही काही प्रमाणात सूट दिली जाईल.
तिसऱया लाटेसाठी सज्जता
केरळमध्ये कोरोनाच्या केसेस वाढत असलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, केरळमधील रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारा आहे. पण तिसरी लाट आपल्याकडे कधी येईल यापेक्षा तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी आपण तयार राहावे या दृष्टिकोनातून आपण सज्जता करीत आहोत. ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्णता आणण्याच्या दृष्टीने सर्व पावले उचलली आहेत.
लसीसाठी केंद्राकडे पाठपुरावा
लसीकरणाच्या बाबतीत लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. लसीकरणामुळे सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. ही आजच्या काळाची गरज आहे. म्हणून लसीकरणाला गती मिळण्यासाठी आम्ही केंद्राला वारंवार विनंती करीत आहोत.
नगर जिल्ह्यात लॉकडाऊन
नगर जिल्ह्यात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यातल्या अकरा जिह्यांमधील निर्बंध कडक करण्याचे सूतोवाच आरोग्यमंत्र्यांनी केले होते. कडक लॉकडाऊनचे अधिकार जिल्हाधिकाऱयांना दिले होते. त्यानुसार नगरमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकलबाबत रेल्वे प्रशासनाशी चर्चा
लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याच्या संदर्भात दोन-तीन पर्याय पुढे आले आहेत. दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाला मुभा दिली तरी प्रवाशांच्या तपासणीची यंत्रणा आहे का, हा मुद्दाही आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे टोपे म्हणाले.
अकरा जिल्हय़ांत निर्बंध कायम
- राज्यातील अकरा जिल्हय़ांना लेव्हल तीनमध्येच ठेवण्यात येईल. त्यात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड व नगर जिह्यांमधील कोणतेही निर्बंध शिथिल करणार नाही किंबहुना जर गरज पडली तर जिल्हाधिकाऱयांच्या माध्यमातून आणखी जास्त निर्बंध कडक करण्यात येतील.
- शनिवारी दुकाने- रेस्टॉरंट सुरू ठेवली जातील, मात्र रविवारी बंद राहतील. दुकाने व रेस्टॉरंट चार वाजेपर्यंत सुरू आहेत. ही वेळ वाढवून रात्री आठपर्यंत सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र क्षमतेवर काही निर्बंध राहतील
- आरोग्य विभागाच्या व टास्क पर्ह्सच्या शिफारशींसह फाइल मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवली आहे. मुख्यमंत्र्याची फाइलवर सही झाल्यावर त्वरित जीआर काढण्यात येईल.
पॉझिटिव्हिटी रेट कमी तिथे शिथिल
पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, मृत्युदर कमी आहे अशा 25 जिह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय झालेला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नागपूर, संभाजीनगर, अकोला, अमरावती, नांदेड, परभणी, धाराशीव, हिंगोली, नाशिक, जळगाव, धुळे व अन्य जिह्यांमध्ये निर्बंध शिथिल होतील.





























































