जिओचा ‘डबल’ धमाका, दुप्पट डाटा आणि फ्री कॉलिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर आणली आहे. याद्वारे ग्राहकाला 4 जी डाटा व्हाउचरमध्ये दुप्पट डाटा मिळणार असून इतर कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सेवाही मिळणार आहे.

‘ट्राय’च्या नियमात बदल झाल्यानंतर जिओने डिसेंबर 2019 मध्ये आपला टॅरिफ महाग केला होता. यामुळे नवीन युजर्सने जिओकडे पाठ फिरवली होती. तसेच जिओची सर्व्हिसही काही प्रमाणात खराब झाल्याची तक्रार ग्राहकांनी केली होती. त्यामुळे ग्राहकांना आपल्याकडे पुन्हा वळवण्यासाठी कंपनीने नवीन नवीन ऑफर आणणे सुरू केले आहे. ग्राहक पुन्हा जिओकडे वळवण्यासाठी जिओने आपल्या काही प्लानमध्ये बदल केले आहेत.

कंपनीने 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये आणि 101 रुपयांच्या डाटा व्हाउचरला रिव्हाईज केले आहे. या रिव्हाईज नंतर…

1. 11 रुपयांच्या बुस्टर पॅकमधील प्लानची वैधतासह अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 75 मिनिट्स दिले जात आहे.

2. 21 रुपयांच्या 4 जी डाटा व्हाउचर प्लानमध्ये आता युजर्संना अॅक्टिव प्लानच्या वैधतेसह 2 जीबी डेटा आणि जिओ टू जिओ कॉलिंगसाठी 200 मिनिट्स दिले जात आहे.

3. 51 रुपयांच्या प्लानमध्ये 4 जी व्हाउचरमध्ये युजर्सना दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी 500 मिनिट्स दिले जात आहे.

4. 101 रुपयांच्या प्लानच्या 4 जी डाटा व्हाउचरमध्ये आता 1000 नॉन जिओ मिनिट्स दिले जात आहे. या प्लानमध्ये फ्री कॉलिंग प्लानची वैधता आधी इतकीच मिळणार आहे. हे व्हाउचर 12 जीबी डाटासह येते. आधी हा प्लान 6 जीबीचा होता. या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा दिले जाते. यात फ्री जिओ ट्यून आणि फ्री एसएमएस सुविधा दिली जात नाही.

यात बदल नाही
जिओने 251 रुपयांच्या आपल्या 4 जी डाटा व्हाउचरमध्ये कोणताही बदल केला नाही. या प्लानमध्ये युजर्संना दररोज 2 जीबी डाटा ऑफर केली जात आहे. या प्लानची वैधता 51 दिवस इतकी आहे. या प्लानमध्ये युजर्संना कॉलिंगसाठी आययूसी टॉप अपची गरज लागत नाही.