विनोद तावडे-पंकजा मुंडेंवर भाजपची संघटनात्मक जबाबदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी मंत्री विनोद तावडे व पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी या दोघांवर भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी पक्षाच्या संघटनात्मक पदाची जबाबदारी देऊन त्यांची बोळवण केली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या भाजपने विनोद तावडे व पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. विनोद तावडे यांची हरयाणाच्या प्रभारीपदी तर पंकजा मुंडे यांची मध्य प्रदेशच्या सहप्रभारीपदी नेमणूक केली आहे.

भाजपने शुक्रवारी नवी दिल्लीतून विविध राज्यांच्या प्रभारी आणि सहप्रभारीच्या नावाची घोषणा केली. प्रभारींच्या यादीत तावडे, मुंडेंसह सुनील देवधर, विजया रहाटकर यांचाही समावेश आहे. सुनील देवधर यांची आंध्रप्रदेश सहप्रभारीपदी तर विजया रहाटकर यांची दमण दीव-दादरा-नगर हवेलीच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली आहे.