कॉलेज फेस्टीव्हलच्या दुनियेची सफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संजीवनी धुरी-जाधव

कॉलेज फेस्टिव्हल्स म्हणजे तरुणाईसाठी मौज, मजा आणि उत्साह…तरुणांच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ. विद्यार्थ्यांसाठी हे फेस्टिव्हल्स म्हणजे एक आगळीच पर्वणी असते. सध्या महाविद्यालयांमध्ये फेस्टिव्हल्सचे वारे वाहू लागले आहेत. तरुणाई रात्रंदिवस या फेस्टिव्हल्सच्या तयारीला जुंपली आहे. जाणून घेऊया आगामी कॉलेज फेस्टिव्हल्स.

व्हीजेटीआयचा ‘प्रतिबिंब’

एकापेक्षा एक भन्नाट डान्स… सुरेल गळ्यासाठी गाण्यांच्या मैफली, हौशी कलाकारांसाठी इमोशनल थिएटर असे वैविध्यपूर्ण इव्हेण्टस्. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी खास सालसा, वाळू कला, नाटक यासारख्या कार्यशाळा असे इव्हेण्ट्सची वेगवेगळी झलक व्हीजेटीआय महाविद्यालयाच्या प्रतिबिंब व्हीजेटीआय 2018 या महोत्सवात 23 ते 26 डिसेंबर या दरम्यान पाहायला मिळणार आहे. ईडीएम नाईट या महोत्सवाचे आकर्षण असणार आहे. व्हीजेटीआयचा प्रतिबिंब फेस्टिव्हल म्हणजे कॉलेज तरुणाईसाठी पर्वणीच. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी दरवर्षी व्हीजेटीआयचा प्रतिबिंब महोत्सव आयोजित केला जातो. व्हीजेटीआयमधून फक्त अभियंतेच नाही तर त्यांच्यासोबत समाजाच्या आणि संस्कृतीच्या सर्क अंगांची ज्यांना ओळख आहे असे कलाकार, नेतृत्क करू शकतील असे नेते आणि सामाजिक रचनेला सुधारण्यात सक्षम असे अधिकारी ही बाहेर पडाकेत हाच प्रतिबिंबचा उद्देश असल्याचे केतन देशपांडे या विद्यार्थ्याने सांगितले.

सोमय्याचा ‘फिनिक्स’

फुटबॉल, बास्केटबॉल, डान्स, गाणे, नाटक, प्रश्नमंजुषा, फोटोग्राफी, कुकिंग विदाऊट फायर, फ्रुट कर्व्हिंग, फेस पेण्टिंग अशा भरगच्च इव्हेण्ट्सचा आस्वाद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. विद्याविहारच्या के. जे. सोमय्या कॉलेजचा ‘फिनिक्स’ फेस्टिव्हल 20 ते 22 डिसेंबर रोजी आयोजित केला आहे. ‘मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ अशी या महोत्सवाची थिम आहे. सोमय्या कॉलेजचा ‘फिनिक्स’ हा आंतरमहाविद्यालयीन फेस्टिव्हल आहे. 2009पासून ‘वाईब्स’ या नावाने असणारा हा फेस्टिव्हल 2015 साली फिनिक्स झाला. फेस्टिव्हलमध्ये लिटरली आर्ट्स, स्पोर्ट्स, फाईन आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स या चार विभागांत पंचवीस इव्हेंण्ट्स या फेस्टिव्हलमध्ये असणार असल्याची माहिती जयदीप देसाई या विद्यार्थ्याने दिली.

ठाकूर महाविद्यालयाचा ‘तारांगण’

स्ट्रीट डान्स, पथनाटय़, समूह नृत्य, गाणे, नेलआर्ट, मेहेंदी, टेली तमाशा, हौशी कलाकारांसाठी अशा विविध इव्हेण्ट्सची रेलचेल असणार आहे. ठाकूर महाविद्यालयाचा ‘तारांगण’ महोत्सव 12 ते 14 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या फेस्टिव्हलची थीम ‘टेलीतमाशा’ आहे. ‘तारांगण’ हा आंतरमहाविद्यालयीन फेस्टिव्हल असून यंदाचे अकरावे वर्ष आहे. या फेस्टिव्हलसाठी मुंबईतून शंभर महाविद्यालय भाग घेणार आहेत. या फेस्टिव्हलमध्ये परफॉर्मिंग आर्ट, फाईन आर्ट, लिटररी आर्ट्स, खेळ, गेम्स, बायोटेक, मिडीया, इनफॉर्मल्स, टेलीतमाशा, फायनान्स मॅनेजमेण्ट, पॉप कल्चर असे इव्हेण्ट्स या महोत्सवात होणार असल्याची माहिती चिन्मय गावडे याने दिली.

नगिनदास खांडवालाचा ‘प्रवाह’

लगोरी, सापशिडी, शब्दकोडे, चिप्पी, टाकावूपासून टिकाऊ अशा विस्मरणात गेलेल्या खेळांना उजाळा मिळणार आहे. निमित्त आहे ते मालाड येथील नगिनदास महाविद्यालयाने 12 ते 15 डिसेंबर दरम्यान होणाऱया ‘प्रवाह ः फ्लो टूवर्ड्स ह्युमिनिटी’ महोत्सवाचे. यंदा या महोत्सवाची थीम ‘लॉस्ट पॅरेडाइज’ अशी आहे. महोत्सवाचे आकर्षण असेल ते विस्मरणात गेलेले खेळ. मिस्टर आणि मिस प्रवाह, मंडाला कलाप्रकार, नृत्य, गाणे, फॅशन शोही आहेत. गायक-संगीतकार सिद्धार्थ स्लाथिया यांचा लाईव्ह कन्सर्ट विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे. तेवीसपेक्षा जास्त महाविद्यालयांनी समावेश घेतल्याची माहिती प्रीतेश देसाई याने दिली.