
काळ कितीही आधुनिक झाला तरी स्त्र्ायांवरील अत्याचार हा सामाजिक प्रश्न आजही कायम आहे. स्त्र्ायांवरील अत्याचाराच्या प्रश्नाबरोबरच एका प्रेमकहाणीवर आधारित ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियात लाँच झाला आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरूनं ऍसिड व्हिक्टिमची भूमिका साकारली आहे. प्रेमकथेसह स्त्र्ायांवरील अत्याचार, ऍसिड हल्ला असे गंभीर मुद्दे या चित्रपटातून हाताळण्यात आल्याचे दिसते.
रिंकूने आजवर केलेल्या भूमिकांमध्ये ही भूमिका खूपच वेगळी असल्याने चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. अ टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी या चित्रपटाच्या निर्मितीसह पटकथा, संवादाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा-दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे, नवोदित अभिनेता विशाल आनंद यांच्याही चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. येत्या 17 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

























































